Sunday, December 31, 2023

आठवणी साडेसाती च्या...

🙏सुप्रभात मित्रांनो🙏

वर्षाच्या शेवटच्या दिवशी हे लिहितोय🙏🙏

मी जवळ जवळ 70-80 ज्योतिष विषयक फेसबुक ग्रुप मध्ये आहे. आणि सध्या कुठल्याही अभ्यासपूर्ण पोस्ट मध्ये धनू, मकर,कुंभ राशीचा उल्लेख झाला असल्यास त्या राशीचे जातक एकच प्रश्न विचारतात 

"आमची साडेसाती कधी संपणार?"

सगळ्यात पहिली गोष्ट शनी महाराज काही कंत्राटी कामगार नाहीत की मनाला वाटलं बोलावून घेतलं, मनाला आलं काढुन टाकलं!!
शनी महाराज स्वतःच्या गतीने चालतील त्यांना कोणीही अगदी कोणीही अडवू शकत नाही कारण शनी महाराज कर्माचे दैवत आहे.🙏
जो कर्म करेल त्याचीच वाहवा होईल!!! इतका साधा नियम शनी महाराजांचा आहे.

आता मूळ पोस्ट मधील प्रश्नाचे उत्तर

भूतलावरील आणि किमान फेसबुक वरील समस्त धनू जातकांनो आपण बारावा शनी हसत खेळत सहन केला पहिला शनी तो ही सहन केला आता दुसऱ्या शनी ने असे कोणते मोठे आभाळ कोसळवले आहे की तुम्ही शनी महाराजांच्या नावाने शंख करत आहात?

धनू वाल्यांना मुक्त उधळायची सवय आहे. पण धनू वाले उधळता उधळता कधी कधी भरकटतात त्याच भरकटणाऱ्या घोड्याला लगाम लावून शनी महाराज पुन्हा ट्रॅक वर आणत आहेत!!! गेल्या 6 वर्षात आणि येत्या 2 वर्षात त्यावर थोडा लगाम लागलाय तो आपल्या भल्यासाठीच आहे,,, 
धनु वाल्यांना काही गोष्टी सहज साध्य होतात कारण ती भाग्यवान राशी आहे सध्या लागलेला लगाम आपलं हितचिंतकच आहे!!!

साडेसाती हे गेल्या तीस वर्षातील आपल्या कर्माचं ऑडिट आहे एवढं मनावर बिंबवा कारण तेच सत्य आहे, शाश्वत आहे!!!!

गेल्या तीस वर्षात आपल्या हातून कुठली दुष्कृत्य झाली असतील निर्णय चुकले असतील तर त्याची चौकशी, मीमांसा शनी महाराज या आठ वर्षात(साडेसात नव्हे!!) करत असतात. त्यांची चौकशी ही ED पेक्षाही भयंकर असते आणि तिथं तुमच्याच चुकलेल्या कर्माची CD शनी महाराज लावत असतात!!! म्हणून साडेसातीचा काळ हा आत्मचिंतनाचा आहे आणि सत्कर्म करण्याचा आहे!!!!

धनू जातकांच्या ज्यांच्या दशा / अंतर्दशा 1,3,8,12 च्या आहेत त्यांनी स्वतःच्या तब्येतीची आणि आर्थिक गणिताची परिपूर्ण काळजी घ्यावी!!

आणि कुठंतरी मनावर कोरून ठेवा
"ये दिन भी जाएंगे"

मकर जातकांनो जर तुमच्या दशा 3,8,12 च्या असतील आणि पुढच्या किमान  दोन वर्षात जर तुम्हला विरक्तीचे डोहाळे लागले तर आश्चर्य वाटून घेऊ नका!!! असा काळ येतो,,, मेष ते धनू वाले यातून गेलेले आहेत!!!

वरती पोस्ट मध्ये 8,12 च्या दशा चा उल्लेख झालाय याचा अर्थ 2,4,5,6,7,9,11 वाल्यांनी रोज दिवाळी साजरी करावी असा होत नाही त्यांनी एकच करावे कायद्यात रहा फायद्यात राहा!!

कुंभ जातकांनो "अभी तो पार्टी शुरू हुई है।"

तूर्तास लेखनसीमा!!!!

✍️ हर्षद मोहन चाफळकर, पुणे
३११२२०२००८३७

पोस्ट नावसहित शेअर करावी अन्यथा शनी महाराज त्वरित दंड करतात!!

Monday, December 25, 2023

ज्योतिष समूहावरचे बर्थ टाईम रेक्टीफिकेशन अर्थात जन्मवेळ शुद्धीकरण...

आजचीच म्हणजे 25 डिसेंबर 2023 ची गोष्ट आहे.
एका ज्योतिष समूहावर BTR करण्यासाठी एका ज्योतिर्विदाना मदत लागत होती..बऱ्याच दिवसांनी हात साफ होणार म्हणून मी संधी साधली...
कुंडली चे डिटेल्स खालीलप्रमाणाने..

स्त्री
23 डिसेंम्बर 2008
जन्मवेळ 16: 20 ते 16: 30 च्या दरम्यान..
मुंबई..

म्हटलं काढा आपली अस्त्र..
प्रश्न कुंडली मांडून आताचे LSRD घेतले

25/12/2023
19.27.28
पुणे
L: बुध
LS: गुरू
S: चंद्र
R: शुक्र
D: चंद्र

मग म्हटलं दिलेल्या मर्यादेच्या लग्नाचे रुलिंग प्लॅनेट पाहू..

16:20 शुक्र । चंद्र । राहू । शुक्र
16: 30 शुक्र । चंद्र । शनी । शनी

म्हटलं LSRD मध्ये चंद्र आणि शुक्र आहे आणि दिलेल्या वेळ मर्यादेत शुक्राचे लग्न आणि चंद्राचे नक्षत्र होते म्हटल्यावर दहा मिनीटातली योग्य वेळ नक्की काढता येईल..

LSRD वर नजर फिरवली..
गुरू LS होऊन जास्त बलवान होता शिवाय दहा मिनिटात राहू आणि शनी च्या सब मध्ये गुरू चा सब आहे...

म्हणजे गुरू हा सब घेता येईल शिवाय राहिलेला बुध सब सब घेता येईल..

झाली लग्नाचे रुलिंग प्लॅनेट फिक्स केले 

शुक्र । चंद्र । शनी । बुध

ती वेळ आली 16: 24 

नुसती वेळ येऊन काय उपयोग जुळली पण पाहिजे ना..

आधीच्या गुरुजींची जुळत नव्हती म्हणून तर समूहावर मदत मागितली...

शांत पणे पाहिल्यावर लक्षात आले 

अरे!!! लग्नाचा सब गुरू हा चंद्राचा नक्षत्रस्वामी आहे..

संपला ना विषय..

ए धडत ततंग धडत ततंग...

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला