Saturday, August 19, 2023

ग्रहांचा गोचर कालावधी

ग्रहांचा #गोचर कालावधी
#रवि: एका राशीत सुमारे एक महिना
#चंद्र: एक राशीत सुमारे सवा दोन दिवस
#मंगळ: एक राशीत दिड ते पावणेदोन महिने
#बुध: एका राशीत पाऊण महिना
#गुरू: एक राशीत तेरा महिने
#शुक्र: एक राशीत पाऊण महिना
#शनी: एका राशीत अडीच वर्षे
#राहू_केतू: एक राशीत प्रत्येकी दीड वर्ष
#हर्षल: एक राशीत सुमारे सात वर्षे
#नेपचून: एका राशीत सुमारे चौदा वर्षे
#प्लूटो: एका राशीत सुमारे चोवीस वर्ष

Wednesday, August 16, 2023

अटल बिहारी वाजपेयी- अंकशास्त्रीय मागोवा

अटल बिहारी वाजपेयी #अंकशास्त्र

जन्मतारीख: 25/12/1924
#जन्मांक: 7
#प्रारब्ध अंक: 8
 जन्मांक 7 व्यक्तीला भावना शील कल्पक, उदार अंतकरणाची, काहीशी अलिप्त वयक्तिमत्त्व बनवते.
वाजपेयींची अंक कुंडली मांडल्यास 2,5,1,2,4 हे अंक दिसतात

2 अंक तीनदा आलाय कारणाने व्यक्ती अतिशय हळव्या कवी मनाची दिसते.मनस्वी आनंद घेणारे आणि देणारे चंद्र लोकप्रियतेचा कारक असल्याने अटलजी अतिशय लोकप्रिय होते. समजसेवा, राजकारण ह्या आवडत्या क्षेत्रात अटलजी कार्यरत राहिले.

1 अंक त्यांच्यातील नेतृत्व गुण दाखवतो. अधिकारपद मिळवण्यात त्यांना या अंकाचा लाभ झाला. याच अंकाने त्यांना मान सन्मान, प्रतिष्ठा दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा सरकार मध्ये असताना उमटवला.

4 अंक राहू हर्षल चा यात त्यांचा कणखरपणा अणूचाचणी सारखा चौकटी बाहेर जाऊन निर्णय घेण्याचा धैर्य त्यांनी दाखवले.

अटलजींनी पहिली पंतप्रधान पदाची शपथ 16 मे 1996 रोज घेतली पूर्ण तारखेची बेरीज केली असता ती येते 1 जो  8  चा शत्रू अंक आहे. ते सरकार 13 दिवसात पडले

दुसऱ्या टर्म ची शपथ त्यांनी 19 मार्च 1998 रोजी घेतली संपूर्ण बेरीज 4 हा मित्र अंक येते त्यांनी 13 महिने सरकार चालवले.

तिसऱ्या टर्म ला शपथ त्यांनी 13 ऑक्टोबर1999 ला घेतली. तारीख आणि वर्ष दोन्ही मित्र अंक या कारणाने ते सरकार साडेचार वर्षे चालले.

दुसऱ्या टर्म मध्ये केलेली अणूचाचणी

11 मे 1998 (7) ते 13 मे 1998(9) दोन्ही मित्रांक  असल्याने यशस्वी झाली.
 कारगिल युद्ध 
3 मे 1999 (9) ते 26 जुलै 1999(7) पर्यँत चालले, दोन्ही मित्रांक असल्याने भारतीय सैन्याने सडेतोड उत्तर देऊन विजय मिळवला.

2004(6) साली अटलजींचा पराभव झाला कारण , वर्ष हे शुक्राच्या अमलाखाली होते जे 7 आणि 8 दोन्ही चे शत्रू अंक आहे.

(सशुल्क मार्गदर्शनासाठी  संपर्क करावा. https://api.whatsapp.com/send?phone=+919765417361)

✒️ Harshad Mohan Chaphalkar

मुलीकडून होकार येईल का?

🌺 ।।#श्रीगुरुदेवदत्त।। 🌺

#कृष्णमूर्तीपद्धती #प्रश्नकुंडली #रुलिंगप्लॅनेट

#प्रश्न: मुलीकडून विवाहासाठी होकार येईल का?

जातक तसा माझ्या लांबच्या ओळखीचा होता.त्याने 9 जुलै 2019ला त्याची आणि मुलीची कुंडली जुळवण्यासाठी पाठवली होती.

दोघांच्या कुंडल्या बघितल्या सप्तम, कुटुंब, भाग्य, महादशा मॅच केल्या. पारंपरिक गुणमेलनात 25 गुण जुळत होते. म्हटलं go ahead त्यानंतरच्या 15-20 दिवसात एकमेकांच्या घरी बघणं झालं. 29 जुलै 2019 ला मुलाने मेसेज केला मुलीकडून होकार येईल का?

प्रश्न बघतानाची वेळ

#दिनांक: 29 जुलै 2019

#वेळ: 18.50

#स्थळ: पुणे

आरपी घेऊया 
L: शनी (व) (1,2,5,7,10,12) लग्नेश व्यायात😢😢❌
LS: रवी (1,2,7,8,12)
S: शनी(व) (1,2,5,7,10,12) व्यायात 😢😢❌
R: चंद्र (1,2,6,7,12) चंद्र स्वराशीत सप्तमात आहे प्रश्न विवाहसंबंधी आहे हे अधोरेखित झाले.♥️
D: बुध (3,6,9,11,12) राहू(3,6,11,12)🤔

सप्तमचा सब: शुक्र (1,2,5,7,10,12)🤔

मुख्य आरपी मधला शनी (व) दोनदा आला म्हणून सोडून दिला.

लग्न नक्षत्रस्वामी रवी 7 बरोबर च 8,12 चा पण कार्येश आहे.😢😢

चंद्र सुद्धा 7 बरोबरच 6,12 चा कार्येश कारणाने परत negative😢😢

बुध सात चा कार्येश नाही.😢😢 पण तो दोन शक्यता दाखवतो.

बुधाच्या राशीत राहू आहे. म्हणून त्याचा विचार केला.  पण  तो 7 चा कार्येश नाही.

थोडा प्रशकुंडलीत 7 चा सब कडे लक्ष गेले तो शुक्र होता😊😊 पण तो 11 चा कार्येश नाही म्हणून बऱ्याच विचारांती त्याला सांगून टाकले 75% नकाराची शक्यता आहे. 25% आशा ठेवायला हरकत नाही(बुध आहे म्हणून).

आणखी एका पद्धतीने उत्तर काढले,
पांडुरंग कोरडे सरांनी सांगितलेली भोपाळ पद्धती

वेळ सायंकाळी 6. 50 ची आहे.
तासात 1 मिळवा ते लग्न स्थान झाले. 6+1= 7 (तूळ लग्न)

मिनिटाला 5 ने भागा 50 ला 5 ने भागून 10 (मकर रास)उत्तर आले ते चन्द्र रास झाली. 

आता या दोन्ही लग्न आणि चंद्र राशीची केंद्र योग होतो म्हणून उत्तर नकारात्मक द्यावे.

आज 16 ऑगस्ट 2019 ला रात्री 9 वाजता फ़ोन आला 
"सर मुलीकडून नकार आला, त्यांना वर्षभर लग्न करायचं नाहीये."

सशुल्क मार्गदर्शनासाठी मेसेंजर मध्ये संपर्क साधावा.

🙏 ।।#श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।🙏

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला