आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये वर्षभर क्रिकेट दौरे सुरू असतात.. एक संघ दुसऱ्या देशात जाऊन कसोटी, वन डे, टी२० मालिका खेळतो.. या मालिका जश्या त्यांच्यातील खेळाच्या दर्जा साठी, आकडेवारी साठी, विक्रमासाठी लक्षात राहतात तश्याच काही मालिका त्यांचा नावामुळे देखील लक्षात राहतात..
अश्याच काही नावाजलेल्या मालिकांचा घेतलेला आढावा..
१. ऍशेस मालिका:
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यमध्ये खेळवली जाणारी ही सगळ्यात जुनी आणि शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही मालिका आहे.. दर चार वर्षांनी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये ही आयोजित केली जाते... आतापर्यंत ७२ ऍशेस मालिका खेळवल्या गेल्या आहेत... ऑस्ट्रेलिया ३४ तर इंग्लंड ३२ मालिका जिंकले आहे...
२. बेनो - कादिर ट्रॉफी:
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाणारी ही मालिका तशी नव्यानेच नाव धारण केलेली आहे.. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ही मालिका पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया मध्ये दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.. ऑस्ट्रेलिया चे महान लेग स्पिनर रीची बेनो आणि पाकिस्तान चे महान लेग स्पिनर अब्दुल कादीर यांच्या नावाने ही मालिका आयोजित केली जाते..
३. बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी:
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही मालिका खेळवली जाते १९९६ साली पहिली मालिका खेळवली गेली अनेक वर्षे ही मालिका ४ कसोटी सामन्यांची होती ऑस्ट्रेलिया मध्ये २०२४- २५ मध्ये होणारी मालिका पहिल्यांदाच ५ कसोटी सामन्यांची होईल.. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचे महान फलंदाज आणि दोन्ही देशांकडून पहिल्यांदा १० हजार कसोटी धावांचा टप्पा पार करणाऱ्या अॅलन बॉर्डर आणि सुनील गावस्कर यांचे नाव मालिकेला देण्यात आले आहे...
४. चॅपेल - हॅडली सिरीज:
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या शेजारी देशांमध्ये ही मालीका दर दोन वर्षांनी वन डे प्रकारात खेळवली जाते २००३- ०४ च्या मोसमात या मालिकेची सुरुवात झाली.. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मधील दोन दिग्गज क्रिकेट घराणी चॅपेल आणि हॅडली यांच्या नावाने ही मालिका खेळवली जाते.. कालांतराने ही मालिका टी२० प्रकारात ही खेळवली गेली..
५. बेसिल डी ओलिव्हिएरा ट्रॉफी:
२००४-०५ च्या मोसमात सुरू झालेली ही कसोटी मालिका इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवली जाते. दक्षिण आफ्रिकी वंशाचे इंग्लिश क्रिकेटपटू बेसिल डी ओलिव्हिएरा यांच्या नावाने ही मालिका खेळवली जाते. बेसिल डी ओलिव्हिएरा यांच्या इंग्लंड संघातील समावेशामुळे १९६८-६९ चा इंग्लंड चा दक्षिण आफ्रिका दौरा रद्द झाला होता. दक्षिण आफ्रिकेने ओलिव्हिएरा यांच्या समावेशाबद्दल आक्षेप घेतले होते. पुढे दक्षिण आफ्रिकेवर वर्णद्वेषाच्या कारणास्तव बंदी आली होती..
६. पतौडी ट्रॉफी:
भारत आणि इंग्लंड यांच्यात इंग्लंड मध्ये होणारी कसोटी मालिका पतौडी ट्रॉफी म्हणून ओळखली जाते.. २००७ साली भारताच्या पहिल्या कसोटी सामन्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ही ट्रॉफी सुरू करण्यात आली. भारताचे सुपुत्र इफ्टीकार अली पतौडी यांच्या समरणार्थ ही ट्रॉफी दिली जाते..
७. अँथनी डी मेलो ट्रॉफी:
भारत आणि इंग्लड यांच्यात भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेस अँथनी डी मेलो ट्रॉफी असे म्हणतात.. अँथनी डी मेलो हे क्रिकेट प्रशासक आणि भारताचे वेगवान गोलंदाज होते.. १९५१-५२ मध्ये या मालिकेस सुरुवात झाली...
८.फ्रॅंक वोरेल ट्रॉफी:
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात ही कसोटी मालिका खेळली जाते, वेस्ट इंडिज चे महान अष्टपैलू फ्रॅंक वोरेल यांच्या नावाने ही मालिका खेळवतात.. फ्रॅंक वोरेल हे थ्री W's (फ्रॅंक वोरेल, सर एव्हर्टन वीक्स,क्लाइड वॉलकोट) पैकी एक लोकप्रिय नाव...
९. फ्रीडम ट्रॉफी:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला फ्रीडम ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. आधी ही मालिका गांधी- मंडेला ट्रॉफी अशी ओळखली जाणार होती मात्र २०१५ साली फ्रीडम ट्रॉफी असे अधिकृत नाव देणात आले.. भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना ही ट्रॉफी समर्पित आहे...
१०. विस्डेन ट्रॉफी:
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला विसडेन ट्रॉफी नाव देण्यात आले. १९६३ साली विसडेन च्या १०० व्या अंकाचे औचित्य साधून ही मालिका सुरू करण्यात आली.. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज मध्ये ही मालिका दर चार वर्षांनी खेळवली जाते...
११. ट्रान्स टासमन ट्रॉफी:
टासमन समुद्राच्या दोन्ही बाजूला असलेल्या ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला ट्रान्स टासमन ट्रॉफी असे नाव दिले गेले आहे.. ही मालिका ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये खेळली जाते. दर चार वर्षांनी ही मालिका खेळवली जाते.
१२. वॉर्न- मुरलीधरन ट्रॉफी:
२००८ साली सुरू झालेली ही मालिका श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दर चार वर्षांनी खेळली जाते. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्न आणि मुथैय्या मुरलीधरन यांच्या नावाने ही मालिका खेळतात...
१३. विव रिचर्ड्स ट्रॉफी:
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात ही मालिका खेळवतात.. १९९८ साली सुरू झालेली ही मालिका दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात दर चार वर्षांनी खेळतात.. वेस्ट इंडिज चे महान आक्रमक फलंदाज सर व्हीव रिचर्ड्स यांच्या नावाने ही मालिका खेळवतात..
- हर्षद मोहन चाफळकर, पुणे