#मूळकवी: वसंत बापट..
#मूळकविता: येशील येशील राणी...
देशिल देशिल देशिल दादा; पहाटे धक्का देशिल ?
तुझिया मनातल्या सत्तेची शपथ साखर झोपेत घेशिल ?
आठव ती पहाट मीडियाची वाट घोळ घालत राहती
तुझी नजर जरा उचलता काका रागाने पाहती
पत्रकारांच्या प्रश्नांचा पाऊस झेलीत उत्तर कधी तू देशिल ?
घड्याळ सुटेल वाट दाखवेल कमळाच्या मोहक पाकळ्या
कोवळ्या पार्थचे जपून रक्षण सांगेल बदलता वारा
संपर्कात नसून गालात हसून लोकांना हार्ट अटॅक देशिल ?
लागता चाहूल टाकशील पाऊल जाळीत ओढशील पक्ष
कोणाला दिसेना, असू दे असेना, रहा सदैव दक्ष
मुक्याने ताईला झाकून टाकता मुख्यमंत्री कधी तू होशिल ?
- हर्षद मोहन चाफळकर , पुणे
१८०४२०२३२०४६