Monday, August 9, 2021

ऑलिम्पिक च्या निमित्ताने

हे आपले या वर्षीचे पदकविजेते आहेत...
नीरज चोप्रा (24 वर्ष)
मीराबाई चानू (27 वर्ष)
पी व्ही सिंधु (26 वर्ष)
लवलीना बोर्गोहेन (23 वर्ष)
बजरंग पुनिया (23 वर्ष)
रवी कुमार दहिया (24 वर्ष)
भारतीय हॉकी संघ (सरासरी वय 26 वर्ष)
आकडे बऱ्याचदा बोलतात अस मी मानतो 100% वास्तव भले सांगणार नाहीत पण आकडे एक व्यापक चित्र नक्की उभं करतात..
मी सुरवातीलाच पदकविजेत्यांची वय का लिहिली माहितीये?? मी एक संबंध जोडण्याचा प्रयत्न करतोय कदाचित तो चुकीचा असेल पण बघा विचार करून...
सहस्त्राकाचं पहिलं ऑलिम्पिक सिडनी 2000 त्यावेळी यांची वये काय असतील?? मलेश्वरी ब्रॉंझ जिंकत असताना मीराबाई चानू आणि सिंधू सोडली तर बाकीचे सगळे अजून शाळेची पायरी पण चढले नव्हते...
अथेन्स 2004 ला राज्यवर्धन राठोड डबल ट्रॅप मध्ये सिल्वर मिळवत होते तेव्हा सिंधू तिच्या 9व्या वर्षात होती चानू 11 वर्षांची होती... बाकीचे अजूनही 8 च्या आतच!!!
2008 च्या बीजिंग ऑलिम्पिक मध्ये हे पदकविजेते त्यांच्या शालेय जीवनाच्या उत्तरार्धात असतात.. आणि टीव्हीवर अभिनव बिंद्रा गळ्यात सुवर्णपदक घालून राष्ट्रगीताला मानवंदना देत असतो.. आणि दरम्यान या प्रत्येक टप्प्यानिशी भारतातील क्रीडा विषयीची पायभूत सुविधा उत्तरोत्तर वाढत जाते...
 माझ्या मते ते अभिनव बिंद्रा चं सुवर्णपदक.. या लोकांना  किती प्रेरणा देऊन गेलं असेल... क्रिकेटेतर खेळ ही भारतात खेळले जातात.. त्या सगळ्या खेळाचं सर्वोच स्थान कुठलं तर ऑलिम्पिक... If Bindra can why can't we?? अश्या देशाच्या क्रीडा इतिहासातील माईलस्टोन घटनेतून आजचा चोप्रा, बोर्गोहेन किंवा सिंधू, पुनिया, दहीया तयार होत असतात..
आणखी या बिंद्राच्या सुवर्णक्षणात भर कशाची पडली माहितीये??
साल 2008 चे पुण्यात इथे बालेवाडी ला झालेले युवा राष्ट्रकुल स्पर्धा लगेच दोन वर्षात 2010 चे राष्ट्रकुल स्पर्धा (ब्रिटिश राजवटीच्या देशांच्या स्पर्धा, यात आजचे ऑलिम्पिक चे टेबल टॉपर नसतात...) त्याच वर्षी म्हणजे 2010 चा हॉकी वर्ल्ड कप.. म्हणजे अचानक देशात एक क्रीडा स्पर्धांच वातावरण तयार झालं होतं.... 
मग असे स्पर्धा भरवून आपल्याला काय मिळत?? या प्रश्नाचं उत्तर मिळायला 10 वर्ष जावी लागतात....
भारतासारख्या 130-135 कोटींच्या खंडप्राय देशात किमान 50 ओलिम्पिक पदक मिळवणारे का तयार होऊ नयेत?? असे प्रश्न काही लोकांना पडतात...
त्याचं उत्तर आज जे नीरज चोप्रा च्या बाबतीत झालं त्यावरूनच कळतं... चोप्रा ने सुवर्णपदक मिळवल्यावर त्याला सरकारी नोकरी मिळाली.. हरयाणा सरकार ने जमीन बक्षीस दिली म्हणे.. मोठ्या आर्थिक बक्षिसांची घोषणा झाली असंही कळलं..
हे सगळं नंतर झालं.. दोन-तीन दिवसांपूर्वी नीरज चोप्रा मला पण माहीत नव्हता.. (खरं सांगतो..) त्याच्या युरोपियन प्रशिक्षकाने पदक जिंकल्यावर व्यवस्थेवर ओढलेले ताशेरे वाचा मग आपल्याला समजेल की खेळाडू घडवताना मेहनत घ्यायची असते.. आर्थिक पाठबळाची तेव्हा खरी गरज असते.. मानसिक आधार प्रोत्साहन लागतं... ते नेमकं तेव्हाच मिळत नाही.. आणि मग अदिती अशोक चं पदक हुकलं, महिला हॉकी संघाचं ब्रॉंझ शेवटच्या काही क्षणात गेलं म्हणून हळहळ व्यक्त करत 4 वर्ष घालवायची... रिओ 2016 मध्ये अभिनव बिंद्राचं ब्रॉंझ काही शतांश गुणांनी गेलं.. दीपा कर्माकर रिओ मध्येच 4थ्या स्थानावर राहिली... तशीच आज अदिती अशोकचा  शेवटच्या शॉट चुकला आणि आधी सिल्व्हर जवळपास निश्चित मानलं जात असताना.. ब्रॉंझ ही हाती लागलं नाही... इथं आपले खेळाडू मोक्याच्या क्षणी धीर सोडतात..
2008 मध्ये विजेंदर सिंग ने बॉक्सिंग मध्ये आणि सुशील कुमार ने कुस्तीत पदक मिळवलं होतं... तेव्हा पासून शूटिंग शिवाय बॉक्सिंग, कुस्ती आपल्याला सलग पदक मिळवून देत आहेत... अजून तिरंदाजीचा दुष्काळ संपलेला नाही..
आज अदिती अशोक चौथ्या स्थानी राहू दे पण  पॅरिस (2024)  लॉस एंजेलीस (2028) आणि ब्रिस्बेन (2032) मध्ये गोल्फ मधून ही पदक मिळत राहीली पाहिजे.. 
-✒️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
०८०८२०२१२३५८

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला