Wednesday, January 20, 2021

सिडनी ते ब्रिस्बेन एक वर्तुळ


#कोलकाता2001 घडत असताना माझ्याकडे केबल टीव्ही नव्हता!! त्यामुळे त्याकाळात दूरदर्शन वर सकाळचा 1 तास आणि संध्याकाळी शेवटच्या सत्रातला एक तास असे दोनच तास कसोटी क्रिकेट बघायला मिळायचं!!! त्यामुळे कसोटी क्रिकेट म्हणजे नेमकं काय हे कळायचं नाही..
माझा कसोटी क्रिकेट खऱ्या अर्थाने बघण्याचा आणि त्याचा आनंद लुटण्याचा प्रसंग आला तो 2003 / 04 साली सौरव गांगुली चा भारतीय संघ बोर्डर गावसकर करंडक मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात गेला होता. ब्रिस्बेन ची पहिली कसोटी पावसात वाहून गेली त्यातही गांगुली ने शतक ठोकले पुढची अडिलेडची कसोटी ऑस्ट्रेलियाच्या लक्ष्मण - द्रविड जोडीने अगदी कोलकाता2001 ची कॉपी असल्यासारखी जिंकून दिली!!! त्या क्षणापासून मी कसोटी क्रिकेटच्या प्रेमात पडलो.... 
पुढची मेलबर्न ची बॉक्सिंग डे कसोटी सेहवाग ने 195 रन करून अगदी जिंकण्याच्या जवळ आणली होती फक्त, एक सत्र आपण खराब खेळलो आणि हाता तोंडाशी आलेला संस्मरणीय मालिका विजय जो लांबला त्यात कित्येकांची कारकीर्द संपली पण ऑस्ट्रेलिया काही हाती लागलं नाही!!!😢😢😢

त्या बोर्डर गावसकर 2003/04 नंतर लगेच काही महिन्यात आपण पाकिस्तानात 15 वर्षांनी कसोटी मालिका खेळण्यासाठी गेलो होतो ती मी प्रत्येक चेंडू टीव्ही वर लाईव्ह पाहिलेली पहिली कसोटी मालिका #मुलतान2004 मध्ये सेहवाग चं त्रिशतक, सचिन चे 196*, आणि चौथ्या दिवशी शेवटच्या बॉल वर तेंडुलकर ने मोईन खान चा दोन पायाच्या मधून उडवलेला त्रिफळा सगळं फ्रेम टू फ्रेम डोळयांसमोर उभं राहतंय!!!!

भारताने भारतात कसोटी मालिका जिंकणे मोठी गोष्ट नाही... पण जेव्हा बाहेर जाऊन एखादी कसोटी जिंकली तरी आनंद गगनात मावत नाही कारण 1932 पासून गेल्या जवळपास नव्वद वर्षात गेली दोन दशके सोडली तर आपण परदेशात फारसे जिंकलेलो नाही. आज सौरव गांगुली bcci चा अध्यक्ष असताना त्याने विजेत्या संघाला 5 कोटींचा बोनस जाहीर केलाय कारण या संघाने त्याचं अपूर्ण स्वप्न पूर्ण केलंय!!

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान अश्या त्या काळात ल्या हाय प्रोफाइल मालिका टीव्ही वर लाईव्ह पाहून कसोटी क्रिकेट च जे गारुड मनावर झालं ते आजतागायत उतरलेलं नाही उतरणार नाही...

या प्रवासात अतिशय वेगळी ठरली ती #Ashes2005 इंग्लंड मधील क्रिकेट टीव्हीवर बघण्याचा आनंद खूप वेगळा आहे क्षणात बदलणार हवामान हवेत स्विंग होणार चेंडू खेळपट्टीवर बारीक कापलेलं हिरवं गवत बॅट आणि बॉल मधला खरी कसोटी!!! जर तुम्ही क्रिकेटप्रेमी असाल आणि जर तुम्ही #एजबस्टन2005 बघितली नसेल तर मग तुम्हावर कसोटी क्रिकेट ची झिंग चढणार नाही. अजून सुद्धा युट्युब ला edgbaston 2005 शोधा सापडेल मी ती लाईव्ह टीव्हीवर बघितली 5 दिवस रक्ताचं पाणी करून दोन संघ लढतात आणि दोन्ही संघातील  अंतर राहत फक्त 2 धावा!!!! पाच दिवस खेळून जिंकणं हरणं जर दोन धावात ठरत असेल तर किती थ्रिल आहे यात याचा विचार करा!!!!

गेल्या दोन दशकात भारतीय संघ बाहेर जाऊन जिंकायला लागलाय सुरुवात सौरव गांगुली ने केली त्याला निर्णायक कळस कदाचित कोहली चढवेल!!!

मधल्या काळात अनेक संस्मरणीय विजय मिळवले #जमेका2006, #जोहान्सबर्ग2006, #नोटिंगम2007, #पर्थ2008, #नेपियर2009 #डरबन2010, #लॉर्ड्स2014 #ट्रेंटब्रिज2018 #अडिलेड2018 #मेलबर्न2018 #जोहान्सबर्ग2018 अजून खूप आहेत एवढे प्रकर्षाने लक्षात राहिले!!!
ऑस्ट्रेलिया सलग दोनदा काबीज केलं बोर्डर गावसकर ऑस्ट्रेलियात जाऊन दोनदा जिंकली धन्य झालो. पण क्षुधा शांती होईल ते क्रिकेटप्रेमी कसले???

या वर्षात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ची फायनल लॉर्ड्स वर आपणच खेळणार हे आजच्या विजयाने जवळपास निश्चित झालंय... फक्त समोर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड की न्यूझीलंड एवढंच ठरवायचंय

याशिवाय......

🏆इथे भारतात इंग्लंड विरुद्ध चार कसोटींची अँथनी डिमेलो ट्रॉफी
🏆मग इंग्लंड मध्ये इंग्लंड विरुद्ध पतौडी ट्रॉफी
🏆 टी20 विश्वचषक भारतात आपल्याच मैदानात
🏆वर्षा अखेरीला दक्षिण आफ्रिकेत गांधी - मंडेला ट्रॉफी

सगळे कठीण पेपर एकाच वर्षात आहेत... आणि तुम्ही करू शकता म्हणून अपेक्षा पण तुमच्याकडूनच आहेत!!!!

शुभेच्छा!!!!💐💐💐💐

-✍️ हर्षद मोहन चाफळकर, पुणे

Thursday, January 7, 2021

ग्रामपंचायत विडंबन

#ग्रामपंचायत२०२१विशेष

#मूळकवी: अजय-अतुल

गावात होतेय चुळबुळ… ग्रामपंचायत लागली
आन अंगात भरलंय वारं… ही खुर्चीची बाधा झाली

आता अधीर झालोया… बघा बधिर झालोया
आन बिनविरोधसाठी ठोकून शड्डू…नेत्यांच्या मागं फिरायलुया
उडतोय बुंगाट, पळतोय चिंगाट… रंगात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

आता उतावीळ झालो… बघा मी लेटरहेड छापीलं
माझ्याच नावाचं मी इनिशल पाटीवर कोरलं
हात दाखवून आलोया… लई सावरून आलोया
आन करून दाढी… भारी कपडा घालून फिरतोया
आवो समद्या गावात… म्या लई जोशात रंगात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

समद्या गावाला झालिया… माझ्या सरपंचपदाची घाई
कधी व्हनार तू रानी… गावाची पाटलीन बाई
आता सनाट फिरतोया… तुमच्या दारात आलुया
लई फिरून बुलेटवरून… चक्कर मारून आलोया
आहो ढिंच्याक जोरात… टेक्नो वरात गावात आलोया

झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

- ✍️ हर्षद मोहन चाफळकर , पुणे
०७०१२०२१०८११

espncricinfo प्रश्न

मी विचारलेला प्रश्न espncricinfo वर प्रकाशित झाला