उद्या दिनांक 14 डिसेंम्बर 2020 रोजी वृश्चिक राशीत ज्येष्ठा नक्षत्रात होणाऱ्या ग्रहणाचे चंद्र राशीनुसार परिणाम, हे परिणाम पुढचे किमान तीन महिने जाणवतील जानेवारी संपेपर्यंत प्रखर अनुभव येण्याची शक्यता!!!
शीर्षटीप: ग्रहण भारतातून दिसणार नसल्यामुळे कोणतेही ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही!!!
मेष♈ हे ग्रहण आपल्या अष्टम स्थानातून होणार असल्याने याकाळात आपल्याला मानसिक त्रास, मनस्ताप नोकरीत कदाचित गुप्त उठाठेवीचा अनुभव येऊ शकतो!!!
वृषभ♉ याकाळात वैवाहिक जीवनात ताणतणाव, विसंवाद जोडीदाराशी विसंवाद मुक्कामी प्रवासात अडचणी येऊ शकतात!!
मिथुन♊ याकाळात आपणाला तब्येतीची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे राहील. अचानक छोटीशी दुखापत मोठी त्रासदायक ठरू शकते!!!!
कर्क♋ विद्यार्जनात खंड, मुलांच्या बाबतीत अनाहूत चिंता संभवते. शेअर सट्टा लॉटरी पासून लांब रहा!!!
सिंह♌ घरातील वावर सांभाळा, घरातील स्त्रीवर्गाशी शुल्लक कारणावरून खटके उडण्याची शक्यता!!!
कन्या♍ शेजारी, भावंडं, यांच्यापासून त्रास, मनस्ताप संभवतो. आर्थिक व्यवहार करताना जपून करावा, लग्न, शुभ कार्यासंबंधी च्या चर्चा पुढे ढकला!!!
तूळ♎ कौटुंबिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता,, खण्यापिण्यातून आजार होण्याची शक्यता!! बाहेरच खाणं कटाक्षाने टाळा!!!
वृश्चिक♏ होणारे ग्रहण आपल्याच राशीत असल्याने याचा सर्वाधिक परिणाम आपल्यावर होणार आहे त्यातल्या त्यात ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी स्वतःची विशेष काळजी घ्यावी तब्येत बिघडणे विनाकारण मनावर ताण निर्माण होणे शक्य आहे!!!
धनू♐ खर्च वाढतील, आर्थिक आवक थोडा काळ थांबेल महत्त्वाची कामे रखडतील डॉक्टरांचा पाहुणचार घ्यावा लागण्याची शक्यता!!!
मकर♑ मित्रमंडळीकडून फसवणूक, सरकारी कामे रखडतील काही जुनी येणी असतील तर ती देखील आणखी काही काळ लांबतील!!!
कुंभ♒ नोकरी व्यवसाय सांभाळा बॉस शी हुज्जत घालू नका, खाली मान घालून सरळमार्गी काम करा, वडिलांशी मतभेद संभवतात!!!
मीन♓ लांबचे प्रवास टाळा, जमल्यास देवदर्शन करा,, उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांमध्येअभ्यासाची तयारी झाली नसेल तर अडथळा येऊ शकतो!!!
तळटीप: ही ग्रहणाची चंद्र राशीवर होणारे सर्वसामान्य परिणाम आहेत,,, प्रत्येकाचे प्रारब्ध वेगळं आहे!!! प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात!!!
🙏।।श्रीदत्तात्रयर्पणमस्तू।।🙏
- ज्योतिष विशारद हर्षद मोहन चाफळकर
वडगावशेरी, पुणे-१४